अपडेट : एशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ

दक्षिण कोरियाच्या इंचियोन इथं सुरु असलेल्या एशियन गेम्स २०१४ मध्ये शूटर्सनं भारतीय मेडल्सचं खात उघडलंय. पहिल्याच दिवशी भारताने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडलची कमाई केली.

Updated: Sep 20, 2014, 02:11 PM IST
अपडेट : एशियन गेम्स : भारताकडे एक गोल्ड, एक ब्राँझ title=

इंचियोन : दक्षिण कोरियाच्या इंचियोन इथं सुरु असलेल्या एशियन गेम्स २०१४ मध्ये शूटर्सनं भारतीय मेडल्सचं खात उघडलंय. पहिल्याच दिवशी भारताने एक गोल्ड आणि एक ब्राँझ मेडलची कमाई केली.


मध्यभागी जितू राय

जितू रायनं भारताला दिलं पहिलं गोल्ड
निशानेबाज जितू रायनं ५० मी. एअर पिस्टल प्रकारात गोल्ड मेडलला गवसणी घातली. फायनलमध्ये जीतूनं व्हिएतनामच्या एन्गुएन होंग फओंग आणि चीनच्या वांग झिवेई यांना टक्कर दिली. पण, या दोघांना क्रमश: रजत आणि कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. जीतूनं १८६.२ अंकांसहित सुवर्ण पदक पटकावलंय. फुओंगला १८३.४ अंक तर झिवेईला १६५.६ अंक मिळाले होते. 

वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या ५० मीटर पिस्टल स्पर्धेत रजत पदक प्राप्त करणाऱ्या लखनऊचा निशानेबाज असणाऱ्या जीतूनं ग्लास्गो कॉमनवेल्थ खेळांमध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं. जीतू सेनेच्या गोरखा रेजीमेंटमध्ये काम करतो.   


उजव्या बाजुला - श्वेता चौधरी

श्वेता चौधरीला ब्राँझ
एशियन गेम्समध्ये श्वेता चौधरीनं भारताच्या खात्यात पहिलं पदक दाखल केलं. श्वेतानं १० मीटर एअर पिस्टल प्रकारात ब्राँझ मेडल पटकावलंय. विशेष म्हणजे, ज्या पिस्टरने श्वेता नेहमी प्रॅक्टीस करते ती पिस्टल दक्षिण कोरियाच्या कस्टम विभागानं ताब्यात घेतल्यानं नव्या पिस्टलनं तिन स्पर्धेत भाग घेतल्यानंतरही मेडलची कमाई केली. श्वेता जगतील निशानेबाजांमध्ये १४६ व्या क्रमांकावर आहे. श्वेता आणि चीनच्या झाऊ दरम्यान कांस्य पदकासाठी शूट ऑफ झालं. यात श्वेता १०.७ अंकांसहीत प्रतिस्पर्धी निशानेबाजांना पछाडण्यात अपयशी ठरली. चीनच्या झांग मेंगयुआननं सुवर्ण पदक पटकावलं. तर कोरियाच्या जुंग जीहेईनं रजत पदक पटकावलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.