सेमीफायनलमध्ये विराटला अनुष्काची साथ, अनुष्का ऑस्ट्रेलियात दाखल!

सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनल मॅचवर आहे. २६ मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहलीची लेडी लव्ह अनुष्का त्याच्या सोबत असेल. 

Updated: Mar 25, 2015, 02:27 PM IST
सेमीफायनलमध्ये विराटला अनुष्काची साथ, अनुष्का ऑस्ट्रेलियात दाखल! title=

सिडनी: सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनल मॅचवर आहे. २६ मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहलीची लेडी लव्ह अनुष्का त्याच्या सोबत असेल. 

अनुष्का विराटच्या या मॅचदरम्यान चिअर अप करण्यासाठी अगदी तयार आहे. अनुष्का सोमवारीच ऑस्ट्रेलियात दाखल झालीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्कानं एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये डिनरही केलं. यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनं मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. 

त्यामुळं या लव्ह बर्ड्सना कुणीही डिस्टर्ब केलं नाही. फॅन्सचं लक्ष आपल्याकडे जावू नये म्हणून ते टॅक्सीनं रेस्टॉरंटमधून गेले. 

बीसीसीआयकडून परवानगी मिळाल्यानंतर सिडनीत पोहोचलेल्या अनुष्काला न जाणो मैदानातूनच काही खास गिफ्ट मिळेल?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.