आपल्याच व्हिडिओसाठी सचिनला मोजावे लागणार पैसे

आपल्याच मॅचचे व्हिडिओ मिळवण्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयला पैसे चुकवावे लागणार आहेत... यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. 

Updated: Apr 21, 2017, 10:23 PM IST
आपल्याच व्हिडिओसाठी सचिनला मोजावे लागणार पैसे title=

मुंबई : आपल्याच मॅचचे व्हिडिओ मिळवण्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बीसीसीआयला पैसे चुकवावे लागणार आहेत... यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. 

सचिनच्या आयुष्यावर आधारीत 'सचिन : ए बिलियन ड्रिम्स' लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच सिनेमासाठी '२०० नॉट आऊट' प्रोडक्शन कंपनीनं काही व्हिडिओ फुटेज बीसीसीआयकडे मागितले होते. या फुटेजसाठी कोणत्याही प्रकारची सूट देण्यास बीसीसीआयनं स्पष्टपणे नकार दिला.

सचिननं निवृत्त होताना केलेल्या भाषणाचा ३ मिनिट ५० सेकंदांचा व्हिडिओ मात्र कोणत्याही शुल्काशिवाय देण्यास बीसीसीआयनं तयारी दर्शवलीय. परंतु, इतर फुटेजचं मात्र कमर्शिअल वापर होणार असल्यानं त्याचे पैसे '२०० नॉट आऊट'ला बीसीसीआयला द्यावे लागणार आहेत.