वर्ल्डकपपूर्वी धोनी एँड कंपनी लक्झरी ब्रेकवर

ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट आणि यानंतर ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियानं सपाटून मार खाल्ल्यानंतर आता धोनी एँड कंपनी लक्झही ब्रेकवर आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियातील 'रेस्ट एँड रेकुपरेट' या अलिशान रिसॉर्टमध्ये अलिशान आराम करत आहेत. 

Updated: Feb 3, 2015, 11:42 AM IST
वर्ल्डकपपूर्वी धोनी एँड कंपनी लक्झरी ब्रेकवर title=

अॅडलेड: ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट आणि यानंतर ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियानं सपाटून मार खाल्ल्यानंतर आता धोनी एँड कंपनी लक्झही ब्रेकवर आहेत. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियातील 'रेस्ट एँड रेकुपरेट' या अलिशान रिसॉर्टमध्ये अलिशान आराम करत आहेत. 

धोनी एँड कंपनी सध्या खराब कामगिरीतून जात आहेत. मात्र तरीही जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेली बीसीसीआय त्यांची यथायोग्य काळजी घेत आहे. टेस्ट आणि ट्राय सीरिजनंतर वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या कम्पलिट रेस्ट मिळावा यासाठी बीसीसीआयनं टीमला अॅडलेडजवळील 'रेस्ट एँड रेकुपरेट' या अलिशान रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी ठेवल आहे.

याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितल की, टीम इंडिया थकली असणार याची आम्हाला जाणीव आहे. यासाठी आम्ही एक रिसॉर्ट बुक केलं आहे. ते त्यांचा मोबाईल स्विच ऑफ करु शकतात. काही प्लेअर्सना आपल्या नातेवाईकांना भेटायला मेलबर्न आणि सिडनीला जायचं आहे. त्यासाठी आम्ही त्यांना परवानगी दिली आहे. जर काही प्लेअर्सना भारतात परतायचं असेल तर त्याचीही परवानगी दिली आहे. मात्र ५ फेब्रुवारीला अॅडलेडमध्ये टीमला एकत्र यावं लागणारच आहे. 

काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियातील प्लेअर्स आपल्या पत्नी आणि गर्ल्ड फ्रेंड्सनाबरोबर घेऊन येऊ शकत नसल्याची घोषणा बीसीसीआयनं केली होती. दरम्यान वर्ल्ड कप दरम्यानच कॅप्टन धोनीला आपण बाबा बनल्याची गोड बातमी मिळणार आहे. त्याकाळात धोनीला भारतात येऊ देण्याची परवानगी बीसीसीआय देऊ शकतं. यामुळं कॅप्टन धोनीचं अर्ध मन आणि चिंता ही घरी लागलेली असणार. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.