बाऊंसरचे शिकार झाले होते हे महान फलंदाज

 ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेस  एका खतरनाक बाऊंसरने जबरदस्त जखमी झाला आणि आता तो जीवन आणि मृत्यूशी झुंज देतो आहे.  या घटनेनंतर पुन्हा एकदा बाऊंसरवर चर्चा सुरू झाली आहे. 

Updated: Nov 26, 2014, 08:07 PM IST
बाऊंसरचे शिकार झाले होते हे महान फलंदाज title=

मुंबई  :  ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युजेस  एका खतरनाक बाऊंसरने जबरदस्त जखमी झाला आणि आता तो जीवन आणि मृत्यूशी झुंज देतो आहे.  या घटनेनंतर पुन्हा एकदा बाऊंसरवर चर्चा सुरू झाली आहे. 
क्रिकेटच्या चेंडूचे वजन जास्त जास्त पाऊणे सहा औंस असते. १०० मैलच्या गतीने २२ फूटांच्या  खेळपट्टीवर हो चेंडू फेकला जातो तेव्हा पापणी लवते न लवते तेव्हा चेंडून फलंदाजाजवळ येतो. त्यावेळी अचानक उसळणारा चेंडू खूपच घातक असतो. असा चेंडून अनेक महान खेळाडूंना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे.  यात रिकी पॉटिंग, माइक गॅटिंग सारख्या  मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. यात भारताचे माजी कर्णधार नारी कॉन्ट्रक्टर यांचे नावही आहे.

भारताचे कर्णधारही झाले जखमी

तीस वर्षापूर्वी हेल्मेट  घालण्यास सुरूवात झाली. त्यापूर्वी फलंदाज विना हेल्मेट फलंदाजी करत होते. त्यामुळे अनेक खेळाडू जलद गती बाऊंसरने जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले आहेत. यात भारताचे कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टरही आहेत. ते वेस्ट इंडिजमध्ये १९६१-६२ सिरीजमध्ये फलंदाजी करताना खतरनाक गोलंदाज चार्र्ली ग्रिफीथ यांच्या बाऊंसरचे शिकार झाले होते. त्याच्या कवटीचे हाड तुटले होते. त्याचे प्राण वाचविण्यासाटी डॉक्टरांनना ऑपरेशन करावे लागले होते. त्यानंतर त्याच्या क्रिकेट जीवनाचा अंत झाला. 

चेंडू लागून चार दिवसांनी झाले निधन

अगदी जुनी घटना पाहिली तर यात सर्वात वाईट घटना इंग्लडमध्ये  १८७०मध्ये घडली होती.  इंग्लिश लीग क्रिकेट युवा जलद गोलंदाज जॉन प्लॅट्सच्या खतरनाक चेंडूने जॉर्ज समर्स नावाचा फलंदाज जखमी झाला होता. लॉर्डसवर ही घटना घडली होती. हा चेंडून समर्सच्या डोक्याला लागला होता.  त्या घरी नेण्यात आले पण तेथे चार दिवसांनंतर त्याचे निधन झाले.

 

इंग्लडचा जलद गोलंदाज हेराल्ड लारवूडने सर्वात जास्त खेळाडूंना जखमी केले आहे. बॉडी लाइन गोलंदाजी ही त्याने क्रिकेटमध्ये आणली होती. त्यामुळे क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलून गेली. १९३२-३३ सिरीजमध्ये लारवूडच्या एका जलद चेंडूने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बर्ट ओल्डफिल्ड चारीमुंड्या चित झाला होता.

आणि तो जीवंत झाला

न्यूझीलंडच्य इवान चॅटफिल्डचा किस्सा तर खूप प्रसिद्ध आहे. १९७४-७५ मध्ये इंग्लड आणि न्यूझीलंड सिरीजमध्ये इंग्लड टीम जिंकण्याचा दिशेने घोडदौड करत होता. पण चॅटफिल्डने बहादुरीने टीमला पराभूत होण्यापासून रोखले होते. यावर इंग्लडचा तेज गोलंदाज पीटर लीव्हरला राग आला त्यांनी एक बाऊंसर फेकला. चेंडू चॅटफिल्डच्या डोक्याला लागला आणि तो पिचवर बेशुद्ध झाला. इंग्लड टीमचे फिझिओने श्वास देऊन त्यांना जिवंत केले. लीवर त्याला बेशुद्ध पाहून रडू लागला होता.

रिकी पॉन्टिंगचे डोके फुटले होते

पण हेल्मेट युग आल्यानंतर परिस्थिती बदलली आणि फलंदाजांना खूप दिलासा मिळाला. पण तरीही अनेक मोठे फलंदाज बाऊंसरचे शिकार होत गेले. यात जस्टिन लँगरही होता. ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज दोन वेळा बाऊंसरमुळे जखमी झाला आहे. १९९२-९३मध्ये वेस्ट इंडिजचा गोलंदाज इयान बिशप याचा चेंडून डोक्याला लागल्यानंतर त्याला दौरा सोडून मायदेशी परतावे लागले होते. असे वाटले की तो निवृत्ती घेईल. दुसऱ्यांदा त्याला दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज मखाया एन्टिनीचा चेंडू २००५-०६ च्या सिरीजमध्ये लागला होता. एन्टिनीचा चेंडू त्याला डोक्याला लागला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  तेथून तो पुढील सामने खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा शानदार फलंदाज रिकी पॉन्टिंगही बाऊंसरचा शिकार झाल आहे. लॉर्डसमध्ये २००५ मध्ये पॉटिंगला स्टिव्ह हार्मिसनचा बाऊंसर लागला होता. प्रथम त्याला काहीच समजले नाही. पण नंतर पाहिले तर त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले.

मार्शलला फलंदाज टरकायचे

वेस्ट इंडिजचा गोलंदाज माल्कम मार्शलला सर्वाधिक फलंदाज घाबरायचे. ताकदवार मार्शल आपल्या शॉर्ट पिच चेंडूसाठी खूप प्रसिद्ध होता. १९८५-८६ च्या सिरीजमध्ये त्याने एक जबरदस्त चेंडून माइक गॅटिंगला आपटला होता. तो गॅटिंगच्या नाकाला लागला होता. तेव्हा रक्ताची धार लागली होती. त्यानंतर त्याला बाहेर घेऊन जावे लागले होते. मार्शलने त्या सिरीजमध्ये फलंदाजाना इतके घाबरवले की एकही फलंदाज टिकला नाही. जास्त गोलंदाज लवकरच बाद झाले.

ते धाडसी खेळाडू
पण असे काही धाडसी फलंदाज आहे, की ज्यांना गोलंदाजांनी जखमी केले, पण ते पुन्हा खेळायला आले. यात एका खेळाडूचा किस्सा या ठिकाणी सांगणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचे नाव बहुतांशी लोकांना माहीत नाही.  तो होता सुल्तान जरावई जो करोडपती आणि हौशी क्रिकेटर होता. तो युएई टीमचे कर्णधार होता. त्याचा सामना १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज अलेन डॉनाल्ड याच्याशी झाला. त्याने हेल्मेट ऐवजी कॅप घातली होती. डोनाल्डची पहिला चेंडून बाऊंसर होता. चेंडू जरावईच्या डोक्याला लागला त्याला चक्कर आली. पण काही सेकंदानंतर त्याने पुन्हा हॅट उचलली आणि फलंदाजी केली. सहा चेंडूनंतर तो बाद झाला, पण आपल्या धाडसीपणाची छाप सोडली. 
इंग्लडचा महान फलंदाज डेनिस क्रॉम्पटनला १९४८ मध्ये रे लिंडवॉलने आपल्या बान्सरने जबरदस्त जखमी केले. त्याच्या डोक्याला टाके पडले. पण तो घाबरला नाही आणि  हॉस्पिटलमधून परतला आणि शानदार फलंदाजी करून १४५ धावा केल्या. 

रमण  लांबांचा दुःखद  अंत
दिल्लीचे जबरदस्त फलंदाज रमण लांबा बांग्लादेशातील लीग मॅचमध्ये खेळत होता.  १९९८ मध्ये ढाकामध्ये तो फिल्डिंग करीत असताना एका फलंदाजाने टोलवलेला चेंडू त्याच्या दिशेने मारला, लांबाला काही समजण्याच्या आत चेंडू त्याच्या डोक्याला लागला. त्यांला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्या ठिकाणी त्याचे निधन झाले. त्याचे वय केवळ ३८ वर्ष होते. लांबाने भारताकडून ३२ वन डे आणि ४ टेस्ट मॅच खेळल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.