कॉमनवेल्थ 2014: भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल

दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

Updated: Jul 25, 2014, 11:30 PM IST
कॉमनवेल्थ 2014:  भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर, ब्राँझ मेडल title=

ग्लास्गो :  दहा मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताच्या अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल पटकाविले. भारताने दहा मेडल मिळवताना पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत (दुसरा दिवस) 3 गोल्ड, 4 सिल्वर, 3 ब्राँझ मेडल पटकावली आहेत.

ऑलिंपिक आणि विश्‍वकरंडक दोन्ही स्पर्धांमध्ये अजिंक्‍यपद पटकाविणारा अभिनव हा एकमेव भारतीय नेमबाज आहे. त्याच्यासह रवी कुमार हादेखील अंतिम फेरीत दाखल झाला होता; पण अंतिम तीनमध्ये पोचण्यास त्याला अपयश आले. तर ५३ किलो वजनी गटात संतोषी मात्साने ब्राँझ मेडल पटकावले.

आज दुसऱ्या दिवशी 16 वर्षीय मलाईका गोयल हिला सिल्वर मेडल मिळाले. दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये मलाईकाने हे पदक मिळविले. जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या हिना सिद्धू पात्रता फेरीत पहिल्या क्रमांकावर असूनही अंतिम फेरीत तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे तिची पदकाची संधी हुकली. पात्रता फेरीमध्ये हिना सिद्धूने 383, तर मलाईका गोयलने 378 गुण मिळविले होते.

दरम्यान, भारताच्या महिला टीमने हॉकीमध्ये विजय मिळविला आहे. महिला संघाप्रमाणेच भारतीय पुरुष हॉकी संघानेही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये दमदार विजयी सलामी दिली. शुक्रवारी झालेल्या पुरुषांच्या सलामीच्या सामन्यात भारताने वेल्सवर 3-1 अशी सहज मात केली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.