कॉमनवेल्थ : भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध धडाका कायम , 25 मेडल

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध घेण्याचा धडाका कायम आहे. 50 मीटर पिस्तल प्रकारात भारताने गोल्ड आणि सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. जितू रायने 194.1 पॉईंट्स कमाई तर केलीच याचबरोबर नव्या कॉमनवेल्थ रेकॉर्डसची नोंदही केली. याखेरीज गुरपाल सिंगने सिल्व्हर मेडलवर नाव कोरत शुटींगमधील भारताचा दबदबा कायम राखला. भारतीय प्लेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे भारताने 25 मेडल्स मिळवत टॅलीमध्येही चौथ्या स्थानी झेप घेतलीय.

Updated: Jul 29, 2014, 08:35 AM IST
कॉमनवेल्थ : भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध धडाका कायम , 25 मेडल title=

ग्लास्गो : कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय शूटर्सचा सुवर्णवेध घेण्याचा धडाका कायम आहे. 50 मीटर पिस्तल प्रकारात भारताने गोल्ड आणि सिल्व्हर मेडलला गवसणी घातलीय. जितू रायने 194.1 पॉईंट्स कमाई तर केलीच याचबरोबर नव्या कॉमनवेल्थ रेकॉर्डसची नोंदही केली. याखेरीज गुरपाल सिंगने सिल्व्हर मेडलवर नाव कोरत शुटींगमधील भारताचा दबदबा कायम राखला. भारतीय प्लेअर्सच्या दमदार कामगिरीमुळे भारताने 25 मेडल्स मिळवत टॅलीमध्येही चौथ्या स्थानी झेप घेतलीय.

कॉमनवेल्थ गेम्सच्या पाचव्या दिवशी भारताला एकही गोल्ड मेडल मिळवता आल नव्हता. मात्र, आज सहाव्या दिवशी सुरुवातीलाच भारताने गोल्ड मेडलची कमाई केली. तामिळनाडूच्या सतिश शिवलिंगमने वेटलिफ्टिंगमध्ये भारताला गोल्ड मेडल पटकावून दिल. 77 किलो वजनी गटात सतीशने सर्वाधिक 328 किलो वजन उचलत गोल्ड मेडलला गवसणी घातली. तर दिल्ली कॉमनवेल्थमध्ये गोल्ड मेडल पटकावलेल्या रवि के.ला सिल्व्हर मेडलवर समाधान मानाव लागल. रवीने 317 किलो वजन मिळवत दुसर स्थान पटकावल.

माजी ऑलिम्पिक मेडलिस्ट गगन नारंगने अपेक्षेप्रमाणे मेडलला गवसणी घातलीय. मात्र त्याला गोल्ड मेडलने थोडक्यात हुलकावणी दिली. 50मी. रायफल प्रोनमध्ये नारंगने सिल्व्हर मेडल जिंकलय. नारंगने 203.6 पॉईंट्सची कमाई केली. गोल्ड आणि सिल्व्हर मडेलवर ऑस्ट्रेलियाच्या शूटर्सने नाव कोरल. वॅरेन पोटेन्टने 204.3 पॉईंट्स कमावर गोल्ड मेडल जिंकल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.