धोनी टीमचा नवा लूक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये क्रिकेट महायुद्ध

क्रिकेट वर्ल्ड कप अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय. जगभरातील १४ टीम्समध्ये क्रिकेटचं हे महायुद्ध रंगणार आहे. क्रिकेट फॅन्ससाठी ही मोठी मेजवाणीच ठरणार आहे. वर्ल्ड कपचा हा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटरसिक आतूरतेने वाट पाहताहेत. तर महेंद्रसिंग धोनी टीमचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. 

Updated: Jan 15, 2015, 02:33 PM IST
धोनी टीमचा नवा लूक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये क्रिकेट महायुद्ध title=

मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलाय. जगभरातील १४ टीम्समध्ये क्रिकेटचं हे महायुद्ध रंगणार आहे. क्रिकेट फॅन्ससाठी ही मोठी मेजवाणीच ठरणार आहे. वर्ल्ड कपचा हा थरार अनुभवण्यासाठी क्रिकेटरसिक आतूरतेने वाट पाहताहेत. तर महेंद्रसिंग धोनी टीमचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. 

जगभरातील अव्वल १४ टीम्स या क्रिकेटच्या महायुद्धामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर क्रिकेटरसिकही क्रिकेटचा हा थरार अनुभवण्यासाठी आतूर झालेले आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या भूमीवर क्रिकेटचं महायुद्ध म्हणजेच वर्ल्ड कप रंगणार आहे. 

विजयासाठी जीवाचं रान करणारे क्रिकेटपटू, केवळ आणि केवळ विजयासाठीच एकमेकांवर चढवलं जाणारं आक्रमण, हाय वोल्टेज लढती, रन्सची बरसात, सिक्स-फोर्सचा थरार, विकेट्सचा खच, विश्वविक्रम, विजयासाठी अटीतटीच्या लढती, श्वास प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी रचलेल्या रणनिती, रणांगणार हमरी-तुमरीवर येणार क्रिकेटपटू, काही प्रतिभावान क्रिकेटपटूंचा शोध, क्रिकेट रसिकांचा अनोखा पाठिंबा, नाट्यमय घडामोडी  आणि श्वास रोखायला लावतील असे क्षण हे सारं काही आपल्याला या क्रिकेटच्या महायुद्धात अनुभवायला मिळणार आहे. 

एकप्रकारे हा क्रिकेटचा महाकुंभचं असणार आहे. कारण जगभरातील अव्वल टीम्स या महाकुंभमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत आणि जगभरातील अस्सल क्रिकेट फॅन्स या महाकुंभळ्याला उपस्थिती लावतील. यामध्ये काही माजी विश्वविजेत्या टीम्स असतील तर काही नव्या आणि अननुभवी टीम्सही खेळताना दिसतील. 

क्रिकेटविश्वातील काहींची सद्दी संपेल तर काही नवे विजेते या महाकुंभमेळ्यात जगाला मिळतील. काही नवे विक्रम रचले जातील तर काही नव्या क्रिकेटपटूचांही उदय होईल. १९७५ पासून सुरु झालेल्या वर्ल्ड कपमुळे क्रिकेट खेळाला प्रत्येकवेळी एक नवी उंची आणि प्रतिष्ठा लाभली.

यंदाचा वर्ल्ड कपही क्रिकेटला पुन्हा एकदा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल. आता क्रिकेटरसिकांना प्रतीक्षा आहे ती केवळ नव्या विश्वविजेत्या टीमचीच.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.