फिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत

 फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही. 

AP | Updated: Jul 5, 2014, 07:31 AM IST
फिफा वर्ल्ड कप - जर्मनी, ब्राझील विजयी तर कोलंबिया, फ्रान्स पराभूत title=

ब्राझील : फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनीने फ्रान्सला १-० ने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. जर्मनीने वर्ल्ड कपमध्ये १३वेळा सेमी फायनल गाठलीय. पहिल्या हाफमध्ये १३व्या मिनिटाला मॅट्स हुमेल्सने गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिलीय. फ्रान्स संपूर्ण मॅचमध्ये एकही गोल करता आला नाही. 

तर दुसरीकडे रंगतदार लढतीत यजमान ब्राझीलने कोलंबियावर २-१ ने मात करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. कॅप्टन थियागो सिल्वाने सातव्याच मिनिटाला नेयमारच्या कॉर्नरवर गोल करत ब्राझिलला आघाडी मिळवून दिली. 

डेविड लुईझने ६८व्या मिनिटाला फ्रि किकवर २५ यार्डावरून अफलातून गोल करत ब्राझिला २-० ने आघाडी मिळवून दिली. मॅच संपायल दहा मिनिट शिल्लक असताना पेनल्टी किकवर गोल्डन बॉय हॅमेज रॉड्रीगेजने गोल करत कोलंबियाला खात उघडून दिल. याचबरोबर या वर्ल्ड कपमध्ये त्याचे ६ गोल्स झाले असून गोल्डन बूटच्या शर्यतीत आपल अव्वल स्थान त्यान कायम राखल.

दरम्यान दुखापतीमुळे मैदान सोडव लागणारा ब्राझिलचा स्टार स्ट्रायकर नेयमार वर्ल्ड कपला मुकणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.