ही पाहा... क्रिकेट जगतातील 'महासेल्फी'

एकाच फोटोत सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, ब्रायन लारा, एम मुरलीधरन, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, अॅडम गिलख्रिस्ट, राहुल द्रविड, डॅनियल वेटोरी आणि युवराज सिंह... काय आश्चर्य वाटतंय का…

Updated: Jul 4, 2014, 07:18 PM IST
ही पाहा... क्रिकेट जगतातील 'महासेल्फी' title=

मुंबई : एकाच फोटोत सचिन तेंडुलकर, शेन वॉर्न, ब्रायन लारा, एम मुरलीधरन, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, अॅडम गिलख्रिस्ट, राहुल द्रविड, डॅनियल वेटोरी आणि युवराज सिंह... काय आश्चर्य वाटतंय का…

पण, हा योग जुळून आला... आणि या क्षणाची साक्ष ही ‘सेल्फी’ देतेय. केविन पीटरसननं ही सेल्फी आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘द ओरिजनल सेल्फी’ म्हणून पोस्ट केलीय. पण, हीच सेल्फी ‘महासेल्फी’ ठरतेय. 

क्रिकेट जगतातले एवढे सगळे तारे यापूर्वी कधीच एकत्र दिसले नव्हते... त्यामुळेच केवीननं हा फोटो शेअर केला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

हे सारे दिग्गज खेळाडू लॉर्डसमध्ये 5 जुलै रोजी एक मॅच खेळण्यासाठी एकत्र आलेत. एमसीसी इलेव्हन आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड अशा नावाच्या दोन टीममध्ये ही मॅच होणार आहे... शनिवारी हाऱ्या या मॅचमध्ये ‘रेस्ट ऑफ द वर्ल्ड’ टीमचा कॅप्टन असेल शेन वॉर्न... आणि एमसीसी इलेव्हनचा कॅप्टन असेल सचिन तेंडुलकर...  

मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी इलेव्हन)

सचिन तेंडुलकर (कॅप्टन), एस. चंद्रपॉल, राहुल द्रविड, ए जे फिंच, ब्रायन लारा, ब्रेट ली, सीएमडब्ल्यू रीड, सईद अजमल, शॉन टेट, उमर गुल, डॅनियल वेटोरी 
 

रेस्ट ऑफ द वर्ल्ड
शेन वॉर्न (कॅप्टन), टी एल बेस्ट, पी कॉलिंगवूड, अॅडम गिलख्रिस्ट, एम. मुरलीधरन, केवीन पीटरसन, वीरेंद्र सेहवाग, शाहिद आफरीदी, पी सिडल, तमीम इक्बाल, युवराज सिंह
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.