गौतम गंभीर आजारी, टीमबरोबर पुण्यात येणार नाही

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर टीममध्ये असणार नाही. त्या आजारी असल्याने पुण्यातील सामन्यात खेळणार नाही. याबाबत त्याने ट्विट केलेय.

Updated: Apr 16, 2015, 04:37 PM IST
गौतम गंभीर आजारी, टीमबरोबर पुण्यात येणार नाही title=

कोलकाता : आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर टीममध्ये असणार नाही. त्या आजारी असल्याने पुण्यातील सामन्यात खेळणार नाही. याबाबत त्याने ट्विट केलेय.

गौतम गंभीरने स्वत:च न खेळण्याबाबत माहिती दिली आहे. गंभीरला ताप आला असून पोट दुखत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे मला थकवा जाणवत आहे. ही वेळ माझ्यासाठी खराब आहे. तब्बेत ठिक नसल्याने मी केवळ दही भात तसेच खिचडी खात आहे, असे त्यांने ट्विट केलेय.

पश्चिम बंगलमधील नागरिकांना नविन वर्षानिमित्ताने शुभेच्छा दिल्यात. मी जरी येथ नसलो तरी मी तुमच्याबरोबर आहे. मित्रानो, माझी तब्बेत ठिक नाही, मला तुमच्या आनंदात मी सहभागी आहे. नाईट रायडर्सचा पुढचा सामना १८ एप्रिला पंजात बरोबर होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.