फिफा वर्ल्डकप 2014 : एक नजर ‘प्री क्वार्टर’ लढतींवर…

Updated: Jun 27, 2014, 01:32 PM IST
फिफा वर्ल्डकप 2014 : एक नजर ‘प्री क्वार्टर’ लढतींवर… title=

 

कुरितिबा (ब्राझील) : फुटबॉल वर्ल्ड कपमधून आणखी एका टॉप टीमला आपला गाशा गुंडाळावा लागला. पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं. कॅप्टन ख्रिस्तियानो रोनाल्डोनं वर्ल्ड कपमध्ये गोल झळकावला. मात्र, त्याला आपल्या टीमला नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश मिळवून देता आला नाही.

ख्रिस्तियानो रोनल्डोच्या टीमचं वर्ल्ड कपच्या नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश कऱण्याचं स्वप्न अखेर स्वप्नचं राहिलं. रिकाम्या हातानं स्टार स्ट्रायकर रोनाल्डोच्या टीमला पोर्तुगालला परताव लागलं. रोनाल्डोनं गोल केला मात्र आपल्या टीमला त्याला नॉक राऊंड गाठून देणं काही जमलं नाही. टॉप 16 मध्ये स्थान पटकावण्यासाठी रोनाल्डोच्या टीमला मॅचमध्ये 5 गोल कऱण्याची आवश्यकता होती.

मात्र, पोर्तुगालला केवळ दोन गोल करता आले. एक गोल तर घानाच्या टीममुळे पोर्तुगालला बहाल झाला. 30 व्या मिनिटाला जॉन बोयेनं आपल्या गोल पोस्टमध्ये बॉल धाडला आणि यामुळेच पोर्तुगालला 1-0 नं आघाडी घेण्यात यश आलं होतं. 57 व्या मिनिटाला घानानं गोल करत बरोबरी साधली. यानंतर मॅचच्या 80 व्या मिनिटाला ख्रिस्तियानो रोनाल्डोनं गोल करत आपल्या टीमला 3 पॉईंट्सची कमाई करून दिली. पोर्तुगालनं ही मॅच जिंकली मात्र त्यांच्या टीमला नॉक आऊट राऊंडमध्ये धडक मारता आली नाही.

पोर्तुगालच्या टीमबाबत कॅप्टन रोनाल्डोच आशावादी नव्हता. त्याचप्रमाणे दुखापतींचा ससेमीरा या टीमच्या मागे लागल्यानं पोर्तुगालला टुर्नामेंटमध्ये काही छाप सोडता आली नाही. जर्मनीविरुद्ध 4-0 नं पराभव स्वीकारल्यानंतर पोर्तुगालला वर्ल्ड कपमध्ये कमबॅकच करता आलं नाही. अखेरच्या मॅचमध्ये विजय मिळवण्य़ात यश आलं हीच काय ती त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. तर  मेसीप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डोचे दन दना जन गोल पाहाता आले नसल्याची खंत फुटबॉल फॅन्सना वाटली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.