भज्जी पागल झालाय - वीरेंद्र सेहवाग

वानखेडे स्टेडिअमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ किंग्ज इलेवन पंजाबकडून पराभूत झाला असेल. पण, मुंबईचा फलंदाज हरभजनने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबई क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. 

Updated: Apr 13, 2015, 07:11 PM IST
भज्जी पागल झालाय - वीरेंद्र सेहवाग title=

नवी दिल्ली : वानखेडे स्टेडिअमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ किंग्ज इलेवन पंजाबकडून पराभूत झाला असेल. पण, मुंबईचा फलंदाज हरभजनने केलेल्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबई क्रिकेट रसिकांची मनं जिंकली. 

भज्जी जेव्हा फलंदाजीसाठी आला तेव्हा मुंबईने ५९ रन्सवर ६ विकेट गमावल्या होत्या. १४ वी ओव्हर संपण्यासाठी दोन बॉल शिल्लक होते त्यावेळी ३८ बॉल्समध्ये ११९ रन्स हवे होते. 

त्यानंतर हरभजनने केवळ २४ बॉल्समध्ये पाच फोर आणि सहा सिक्सच्या मदतीनं ६४ धावा ठोकल्या. मात्र हरभजनची ही स्फोटक खेळी मुंबई इंडियन्सला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. 
 
सामना संपल्यानंतर आपल्या फलंदाजी बद्दल बोलताना हरभजन बोलला की, 'मी हा विचार करून मैदानात उतरलो होतो की बॉल मोठे शॉट मारण्यासारखा असेल तर मारायचा आणि मी तेच केले'

भारतीय टीममध्ये हरभजनचा सहखेळाडू असलेला विरेंद्र सेहवाग पंजाबच्या टीममधून खेळत होता. हरभजनची धमाकेदार फलंदाजी सेहवाग पाहात होता. 


विरु

सामना संपल्यानंतर सेहवागने, 'आज भज्जी पागल झाला होता. आम्हाला वाटलं हे १०, २०, ३० रन्सपर्यंत चालेल मात्र त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली' अशी मनोरंजक प्रतिक्रिया दिली. 

तर, 'आम्हाला हरभजनकडून फलंदाजी शिकायला हवी. त्याने जोरदार फलंदाजी करत आम्हाला सामन्यात परत आणलं होतं' अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहीत शर्मानं दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.