हर्षा भोगलेचा पुन्हा धोनीवर निशाणा

आयपीएलच्या बैंगलोर विरुद्धच्या मॅचवेळी पुण्याचा झालेल्या पराभवावरून क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे.

Updated: Apr 23, 2016, 05:53 PM IST
हर्षा भोगलेचा पुन्हा धोनीवर निशाणा title=

मुंबई: आयपीएलच्या बैंगलोर विरुद्धच्या मॅचवेळी पुण्याचा झालेल्या पराभवावरून क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेंनी पुन्हा एकदा धोनीवर निशाणा साधला आहे. स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यानंतर धोनी बॅटिंगला आला आणि त्यानं 38 बॉलमध्ये 41 रन केल्या. 

180 पेक्षा जास्त रनची आवश्यकता असताना 38 बॉलमध्ये केलेल्या 41 रननी तुम्ही मॅच जिंकू शकत नाही, असं ट्विट हर्षा भोगलेंनी केलं आहे. 

टी 20 वर्ल्ड कपवेळी समालोचन करतानाही हर्षा भोगले वादात आले होते. भारतीय समालोचकानं इतर देशांच्या खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंविषयी बोललं तर फार चांगलं होईल, असं ट्विट बांग्लादेशविरुद्धच्या मॅचनंतर अमिताभ बच्चन यांनी केलं होतं. बच्चन यांचं हे ट्विट धोनीनंही रिट्विट केलं होतं. त्यामुळे वाद वाढला होता. 

या वादामुळेच हर्षा भोगलेंना आयपीएलमध्ये समालोचन करण्याच्या शेवटच्यावेळी काढण्यात आल्याचं बोललं गेलं. पण आता पुन्हा एकदा भोगलेंनी धोनीच्या खेळीवर टीका केली आहे.