अमलाच्या २४४ चेंडूत अवघ्या २५ धावा

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात धीम्या गतीने फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत आता हाशिम अमलाच्या नावांचाही समावेश झालाय. भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात अमला २५ धावा करुन बाद झाला. मात्र या इतक्या धावा बनवण्यासाठी त्याने तब्बल २४४ चेंडू खर्ची घातले. अमलाचा स्ट्राईक रेट प्रति ओव्हर ०.६१ इतका होता. 

Updated: Dec 7, 2015, 02:24 PM IST
 अमलाच्या २४४ चेंडूत अवघ्या २५ धावा title=

नवी दिल्ली : टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात धीम्या गतीने फलंदाजी करणाऱ्यांच्या यादीत आता हाशिम अमलाच्या नावांचाही समावेश झालाय. भारताविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील अखेरच्या दिवशी आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात अमला २५ धावा करुन बाद झाला. मात्र या इतक्या धावा बनवण्यासाठी त्याने तब्बल २४४ चेंडू खर्ची घातले. अमलाचा स्ट्राईक रेट प्रति ओव्हर ०.६१ इतका होता. 

विजयासाठी ४८१ धावांचे आव्हान असलेल्या आफ्रिकेने चौथ्या दिवसअखेर ७२ षटकांत अवघ्या ७२ धावा केल्या. अमला चौथ्या दिवसअखेर २०७ चेंडूत २३ धावांवर नाबाद होता. त्यानंतर पाचव्या दिवशी ३७ चेंडूत आणखी दोन धावा केल्या आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला. कसोटीच्या शेवटच्या दिवशीही आफ्रिकेची धीमी फलंदाजी सुरु आहे.

चार सामन्यांच्या मालिकेत भारताने यापूर्वीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे अधिकाधिक वेळ खेळपट्टीवर टिकून राहत कसोटी अनिर्णीत राखण्याचा प्रयत्न आफ्रिका करेल. तर पाहुण्यांना झटपट गुंडाळत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.