'मी विराटसारखा नाही'

ऑस्ट्रेलियाला लोळवून भारतीय संघानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली.

Updated: Mar 28, 2016, 06:02 PM IST
'मी विराटसारखा नाही' title=

मोहाली: ऑस्ट्रेलियाला लोळवून भारतीय संघानं टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. कांगारूंना एकहाती लोळवणाऱ्या विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनंही कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मी विराट कोहलीसारखा अष्टपैलू नाही, मला त्याच्या सारख्या कव्हर, स्क्वेअर आणि थर्ड मॅनवरून फोर मारता येत नाहीत, मी त्याचा सारखा ग्रेट नाही, असं धोनी म्हणाला आहे.

मी एक आणि दोन रन काढण्याचा प्रयत्न करतो, आणि मारण्यासारखा बॉल असेल तर सिक्स मारायचा प्रयत्न करतो अशी प्रतिक्रिया धोनीनं दिली आहे.