बेकायदेशीर बॉलिंगसाठी 'पाक'चा सईद अजमल निलंबित

'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (आयसीसी) पाकिस्तानचा ऑफ स्पिनर आणि सध्या वन डे रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या सईद अजमल याला निलंबित केलंय. 

Updated: Sep 9, 2014, 04:09 PM IST
बेकायदेशीर बॉलिंगसाठी 'पाक'चा सईद अजमल निलंबित title=

दुबई : 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (आयसीसी) पाकिस्तानचा ऑफ स्पिनर आणि सध्या वन डे रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या सईद अजमल याला निलंबित केलंय. 

अजमलची बॉलिंग अॅक्शन बेकायदेशीर असल्याचं आढळल्यानं आयसीसीनं त्याला निलंबित केल्याचं म्हटलंय. पाक क्रिकेटर्सनं मात्र आपल्या ऑफ स्पिनर खेळाडूला पाठिंबा दिलाय. अजमलविषयी सहानुभूती व्यक्त करत, सईद अजमल आपल्या बॉलिंगच्या पद्धतीत सुधारणा करून पुन्हा धमाकेदार एन्ट्री करेल, असं त्यांनी ट्विट केलंय. 

स्वतंत्र विश्लेषकांनी पाकिस्तानचा ऑफ स्पिनर सईद अजमल याच्या बॉलिंगची पद्धत बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळे अजमल याला ताबडतोब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉलिंग करण्यापासून निलंबत करण्यात आलंय, असं आयसीसीनं जाहीर केलंय. 

विश्लेषणातून दिसतंय की, 36 वर्षीय अजमलची बॉलिंगची पद्धत आयसीसीच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करतेय. नियमानुसार, कोणताही बॉलर 15 डिग्रीपर्यंत आपल्या कोपर दुमडू शकतो. परंतु, अजमलचा कोपर बॉलिंग करताना याहून अधिक दुमडला जातो. 

गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध 'गाले'मध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचनंतर अजमलच्या अॅक्शनबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. आपल्या खेळात सुधारणा केल्यानंतर अजमल पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय खेळांत सहभागी होण्यासाठी विनंती करू शकतो.

सईद अजमलचा रेकॉर्ड

अजमलनं पाकिस्तानकडून 35 टेस्ट मॅच खेळल्या आहेत ज्यामध्ये त्यानं 178 विकेट घेतलेत. अजमलचा वन डे रेकॉर्ड तुफान दिसतोय. त्यानं 111 मॅचमध्ये 183 विकेट घेतल्यात. तर, अजमलनं 63 टी-ट्वेन्टी मॅचमध्ये सहभाग घेतला यात त्यानं 85 विकेट काढल्यात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.