रँकिंगमध्ये दुसरे स्थान टिकवण्यासाठी भारताला हवा एक विजय

मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होत आहे. या मालिकेतील निकालाचा परिणाम आयसीसीच्या वनडे रँकिंगवरही पडेल.

Updated: Jan 11, 2016, 09:32 AM IST
रँकिंगमध्ये दुसरे स्थान टिकवण्यासाठी भारताला हवा एक विजय title=

दुबई : मंगळवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होत आहे. या मालिकेतील निकालाचा परिणाम आयसीसीच्या वनडे रँकिंगवरही पडेल.

वनडे रँकिंगमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया १२७ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर भारत ११४ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिका ११२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

या मालिकेत ऑस्ट्रेलियाने सर्व सामने गमावल्यास त्यानंतरही ऑस्ट्रेलिया अव्वल स्थान कायम राखू शकणार आहे. मात्र या मालिकेत भारताने एकही सामना जिंकला नाही तर तो १११ गुणांसह चौथ्या स्थानी घसरेल. तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. त्यामुळे दुसरे स्थान कायम राखायचे असल्यास भारताला मालिकेतील कमीत कमी एक सामना जिंकावाच लागेल