ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, रोहितची सेंच्युरी व्यर्थ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरी वनडे होत आहे.  

Updated: Jan 15, 2016, 07:15 PM IST

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौ-यावर असलेल्या धोनी एँड कंपनीच्या पदरी पुन्हा पराभव पडलाय. कांगारुंनी टीम इंडियावर दुस-यावर वन-डेमध्ये सात विकेट्सनं मात करत पाच वन-डे सीरिजमध्ये 2-0नं आघाडी घेतलीय.

टीम इंडियान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 309 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. कांगारुंनी 3 विकेट्स गमावत 49व्या ओव्हरमध्ये हे टार्गेट पार करत सलग दुस-या विजयाची नोंद केली.

फिंच आणि मार्शनं प्रत्येकी 71 रन्स केल्या. तर स्मिथनं 46 आणि जॉर्ज बेलीनं नॉट आऊट 76 रन्स केल्या. भारताकडून ईशांत, उमेश आणि जाडेजानं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

तत्पूर्वी टीम इंडियानं टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. रोहितनं पुन्हा सेंच्युरी झळकावली. मात्र त्याची सेंच्युरी पुन्हा व्यर्थ ठरली. विराटनं 59 तर रहाणेनं 89 रन्स केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून जेम्स फॉल्कनरनं दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान टीम इंडिया पराभूत जरी झाली असली तरी रोहित शर्माला 'प्लेअर ऑफ द मॅच'नं गौरवण्यात आलं.

पाहा स्कोअरकार्ड