ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या कसोटीवर पकड मजबूत

ऑस्ट्रलियाचा पहिला डाव ४५१ धावांत आटोपला असला तरी कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या दीडशतकी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलियानं आपली पकड आणखी मजबूत केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 17, 2017, 02:16 PM IST
ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या कसोटीवर पकड मजबूत title=

रांची : ऑस्ट्रलियाचा पहिला डाव ४५१ धावांत आटोपला असला तरी कर्णधार स्टिव्हन स्मिथच्या दीडशतकी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलियानं आपली पकड आणखी मजबूत केलीय.

मॅक्सवेलचे कसोटी करिअरमधील हे पहिलेच शतक ठोकले. त्याला आऊट करण्यात रवींद्र जाडेजाला यश आलं. मात्र, ऑस्ट्रेलिया आता चारशे रन्सच्या आसपास पोहोचली. भारतीय बॉलर्सना कांगारु बॅट्समनना रोखण्यात अपयश आलंय. त्यातच विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्यानं भारतीय गोटात चिंतेचं वातवरण आहे. 

ऑस्ट्रेलियाचे तळातील फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने डाव झटपट गुंडाळण्यात टीम इंडियाला यश आले. उपहारानंतर टीम इंडिया बॉलरने टिच्चून मारा केला. ऑस्ट्रेलियाला ५०० धावांच्या आत रोखण्यात यश आलं. फिरकी गोलंदाज रवींद्र जाडेजानं सर्वाधिक ५ बळी मिळवले. उमेश यादवनं ३ आणि आर. अश्विननं एक बळी मिळवला. या आधी पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने आणि दुसरी कसोटी टीम इंडियाने जिंकल्यामुळे रांचीतीत कसोटीला महत्व प्राप्त झाले आहे.