धोनीच्या शिलेदारांनी घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 27 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं ही टी-20 सीरिजही खिशात घातली. आणि वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

Updated: Jan 29, 2016, 06:11 PM IST
धोनीच्या शिलेदारांनी घेतला वनडेतल्या पराभवाचा बदला title=

मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताचा 27 रननी दणदणीत विजय झाला आहे. या विजयामुळे भारतानं ही टी-20 सीरिजही खिशात घातली. आणि वनडेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते रोहित शर्मा आणि विराट कोहली. या दोघांनीही हाफ सेंच्युरी केल्या. रोहित शर्मानं 47 बॉलमध्ये 60 तर विराट कोहलीनं 33 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. तर शिखर धवननंही 32 बॉलमध्ये 42 रन केल्या. त्यामुळे भारताला 184 रनपर्यंत मजल मारता आली.टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय ऑस्ट्रेलियानं घेतला पण तो काही फारसा सफल झाला नाही.

त्यानंतर 185 रनचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियानंही चांगली सुरुवात केली. ओपनिंगला आलेल्या ऍरोन फिंच आणि शॉन मार्शनं 94 रनची पार्टनरशीप केली. पण मार्शची विकेट गेल्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाची पडझड सुरु झाली.

ऑस्ट्रेलियाला आपल्या निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 157 रनपर्यंत मजल मारता आली, आणि भारताचा 27 रननी विजय झाला. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन तर अश्विन, पंड्या आणि युवराजनं प्रत्येकी 1 विकेट घेतली.