गेलला या भारतीय तरुणीने दिली डेटची ऑफर

रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा धडाकेबाज ओपनर बॅट्समन क्रिस गेलला एका भारतीय तरुणीने डेटसाठी ऑफर केली आहे. राइजिंग पुणे सुपरजायंट्स विरोधात क्रिस गेलने जर शतक लगावलं तर या आश्चर्यचकीत होऊ नका. कारण या तरुणीने गेलला अशी ऑफर केली आहे जर त्याने मॅचमध्ये शतक लगावलं तर ही तरुणी त्याला डेटवर घेऊन जाणार आहे आणि हॉटेलचं बिल देखील तीच देणार आहे.

Updated: May 6, 2016, 04:11 PM IST
गेलला या भारतीय तरुणीने दिली डेटची ऑफर title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा धडाकेबाज ओपनर बॅट्समन क्रिस गेलला एका भारतीय तरुणीने डेटसाठी ऑफर केली आहे. राइजिंग पुणे सुपरजायंट्स विरोधात क्रिस गेलने जर शतक लगावलं तर या आश्चर्यचकीत होऊ नका. कारण या तरुणीने गेलला अशी ऑफर केली आहे जर त्याने मॅचमध्ये शतक लगावलं तर ही तरुणी त्याला डेटवर घेऊन जाणार आहे आणि हॉटेलचं बिल देखील तीच देणार आहे.

क्रिस गेलच्या ट्विटर अकाऊंटवर दिल्लीच्या एका फॅनने त्याला अशी रिक्वेस्ट केली आहे की, माझं हद्य फक्त तुझ्यासाठी धडकतं, आपण डेटवर जाऊ शकतो का? यावर गेलने ही लगेच उत्तर दिलं की, का नाही, पण बिल तुला द्यावं लागेल. मग त्या तरुणीने ही त्यावर लगेच उत्तर दिलं की, नक्की पण जर तु आगामी मॅचमध्ये शतक ठोकलं तर. आता यावर गेल काय बोलतो हे पाहावं लागेल.