डेव्हिस कप स्पर्धेत विजयानंतर भारतीय टेनिसपटूंचा डान्स

डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील आशिया\ओशानिया गटात भारताच्या टेनिसपटूंनी जबरदस्त खेळ करत दक्षिण कोरिया संघावर शानदार विजय मिळवला.

Updated: Jul 18, 2016, 10:46 AM IST
डेव्हिस कप स्पर्धेत विजयानंतर भारतीय टेनिसपटूंचा डान्स title=

चंदीगड : डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील आशिया\ओशानिया गटात भारताच्या टेनिसपटूंनी जबरदस्त खेळ करत दक्षिण कोरिया संघावर शानदार विजय मिळवला.

एकेरीतील दोन आणि दुहेरीतील एक लढत जिंकत भारतीय संघाने कोरियावर ४-१ असा विजय मिळवला. रोहन बोपण्णाने एकेरीत होंग च्युंगवर विजय मिळवला. ही लढत जिंकल्याने जागतिक गटाच्या प्ले ऑफ लढतींसाठी भारतीय संघ पात्र ठरलाय.

कोरियावर विजय मिळवल्यानंतर भारतीय चाहत्यांनी मोठा जल्लोश केला. यावेळी भारताच्या टेनिसपटूंनी कोर्टवर बॉलीवूडच्या गाण्यावर ठेका धरला. 

पाहा संपूर्ण व्हिडीओ