आयपीएल-८ : शेवटच्या बॉलवर राजस्थान रॉयल विजयी, सलग चौथा विजय

राजस्थान रॉयलने आपला सलग चौथा विजय साकार केलाय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. मुंबईच्या अजिंक्य रहाणे (६२ रन्स ठोकत) विजय साकारला.

Updated: Apr 17, 2015, 03:06 PM IST
आयपीएल-८ : शेवटच्या बॉलवर राजस्थान रॉयल विजयी, सलग चौथा विजय title=

हैदराबाद : राजस्थान रॉयलने आपला सलग चौथा विजय साकार केलाय. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. मुंबईच्या अजिंक्य रहाणे (६२ रन्स ठोकत) विजय साकारला.

सनराइजर्स हैदराबादला राजस्थान रॉयलने ६ विकेटने पराभूत केले. रनराइजर्सने १२७ रन्सचे टार्गेट ठेवले होते. मात्र, विजयासाठी राजस्थानला संघर्ष करावा लागला. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगला.

रहाणेची मॅन ऑफ द मॅच निवड करण्यात आली. अजिंक्यबरोबर संजू सॅमसन (२६)ने ६४ रन्सची भागिदारी केली. चांगली सुरुवात झाली असताना विकेट गेली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१३) फारशी चमक दाखवू शकला नाही. रवी बोपारा (१) लगेच आऊट झाला. तर रहाणेने ४६ बॉलमध्ये साच चौकार ठोकलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.