इंग्लंडच्या पत्रकारांना कोहलीचं चोख प्रत्युत्तर

इंग्लंडविरुद्ध उद्या कानपूरमध्ये पहिली टी20 मॅच होत आहे. या मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंडच्या पत्रकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Updated: Jan 25, 2017, 07:17 PM IST
इंग्लंडच्या पत्रकारांना कोहलीचं चोख प्रत्युत्तर  title=

कानपूर : इंग्लंडविरुद्ध उद्या कानपूरमध्ये पहिली टी20 मॅच होत आहे. या मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं इंग्लंडच्या पत्रकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. इंग्लंडनं टी20 टीममध्ये टायमल मिल्सला सहभागी केलं आहे. इंग्लंडमध्ये टी20 स्पेशलिस्ट म्हणून मिल्सची ओळख आहे.

टायमल मिल्सबाबत इंग्लंडच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कोहलीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये मी आत्तापर्यंत 90 माईल्स प्रति किलोमीटरनं बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सचा सामना केला आहे. मिल्सला मी बॉलिंग करताना बघितलेलं नाही, त्यामुळे दुसऱ्या मॅचनंतरच मी मिल्सविषयी बोलीन असं कोहली म्हणाला आहे.