मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहली कमबॅक करणार

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या सुरवातीच्या काही मॅचना विराट कोहलीला मुकावं लागलं आहे.

Updated: Apr 11, 2017, 05:30 PM IST
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहली कमबॅक करणार  title=

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या सुरवातीच्या काही मॅचना विराट कोहलीला मुकावं लागलं आहे. पण आता विराटच्या कमबॅकची तारीख ठरली आहे. १४ तारखेला होणाऱ्या मॅचमध्ये कोहली खेळणार आहे. खुद्द कोहलीनंच ही प्रतिक्रिया दिली आहे. व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ कोहलीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

१४ तारखेला बंगळुरूची मुंबईविरुद्ध मॅच होत आहे. यंदाच्या मोसमात सुरुवातीपासूनच आरसीबीच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. विराटबरोबरच लोकेश राहुल आणि एबी डिव्हिलियर्सलाही दुखापत झाली होती. काल झालेल्या पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये एबी डिव्हिलियर्सनं कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. 

 

Can't wait to get back onto the field. Almost there now . 14th April

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on