फायनलआधी लोकेश राहुलचे जेतेपदाबाबत विधान

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११ मेला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की यापुढचे सगळे सामने बाद फेरीसारखे असणार आहे. या स्थितीत आराम केला जाऊ शकता. यापुढील सगळे सामने जिंकावेच लागलेच. 

Updated: May 28, 2016, 04:03 PM IST
फायनलआधी लोकेश राहुलचे जेतेपदाबाबत विधान title=

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला ११ मेला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात एका महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की यापुढचे सगळे सामने बाद फेरीसारखे असणार आहे. या स्थितीत आराम केला जाऊ शकता. यापुढील सगळे सामने जिंकावेच लागलेच. 

त्यानंतर आरसीबीने पुढील आठ सामन्यापैकी सात सामन्यात विजय मिळवत आयपीएलची फायनल गाठलीये. जेतेपदापासून आरसीबी केवळ एक विजय दूर आहे. 
आता आरसीबीचा सामना रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. 

या सामन्यापूर्वी आरसीबीचा फलंदाज लोकेश राहुलने सांगितले की, अंतिम सामन्याआधीच आम्हाला जेतेपद जिंकल्यासारखे वाटतेय. ज्या स्थानावर आम्ही होतो तेथून दुसऱ्या स्थानावर येणे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमच्या टीममध्ये मोठा आत्मविश्वास आहे.