धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा!

टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद का सोडले याचा खुलासा माजी कसोटीपटू आणि भारतीय क्रिकेट टीमचे संचालक रवी शास्त्री यांनी केलाय. डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात तिसऱ्या कसोटी मॅचनंतर धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Updated: Aug 28, 2015, 03:39 PM IST
धोनीने कसोटीतून अचानक निवृत्ती का घेतली, रवी शास्त्रीने केला खुलासा! title=

मुंबई : टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अचानक कर्णधारपद का सोडले याचा खुलासा माजी कसोटीपटू आणि भारतीय क्रिकेट टीमचे संचालक रवी शास्त्री यांनी केलाय. डिसेंबर २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात तिसऱ्या कसोटी मॅचनंतर धोनीने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

धोनीने घेतलेल्या निवृत्तीमुळे क्रिकेट विश्वात आश्चर्य व्यक्त झाले होते. धोनीने  प्रसिद्ध पत्रक काढून निवृत्ती जाहीर केली. यामुळे अनेक जण या निर्णयामुळे हैरान झालेत. धोनीने कोणाला न सांगता अचानक निवृत्ती घेतली. एवढा मोठा निर्णय घेताना असं का केलं, याचीच चर्चा अधिक झाली. मात्र, रवी शास्त्री यांनी याबाबत खुलासा केलाय. त्यांनी धोनीच्या निवृत्तीवर प्रकाश टाकलाय.

आयबीएनलाईव्ह.कॉमच्या नुसार शास्त्रीने म्हटले आहे, माझे म्हणणे आहे की, निवृत्ती घेण्यामागे जी काही कारणे आहेत त्यात एक आहे. तीन प्रकारात क्रिकेट खेळणे त्याच्यासाठी कठिण झाले होते. तसेच टीम इंडियाची जबाबदारी घेण्यासाठी त्यांने अन्य खेळाडू तयार केलेत. तुम्ही आधीचा कालावधी पाहिला तर त्याने निवृत्तीबाबत का असा निर्णय घेतला, त्याची उकल होऊ शकते.

धोनीचा हा चांगला निर्णय आहे. कारण सर्वच क्षेत्रात भविष्यातील कर्णधार विराट कोहली याची चर्चा होत होती. मीडियात याचीच चर्चा अधिक होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरोधात कसोटी क्रिकेट सामन्यानंतर कर्णधारपद सोडले आणि विराटकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. त्यामुळे अनेक चर्चांना पूर्णविराम झाला, असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

आपण सर्व जण जाणतो, विराटला सर्वांची पसंती होती. मात्र, धोनी लवकर निवृत्ती घेईल, असे वाटले नव्हते. धोनीने विराटवर विश्वास दाखवला आणि त्याला पुढे नेतृत्व करण्याची संधी दिली, असे मत शास्त्री यांनी व्यक्त केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.