टेस्टमध्ये नंबर एकवर गेलेल्या पाकिस्तानची सोशल नेटवर्किंगवर गरळ

पाकिस्तान आणि इंग्लंडमधली टेस्ट सीरिज 2-2नं बरोबरीमध्ये सुटली आणि भारतानं वेस्ट इंडिजला 2-0 नं हरवलं.

Updated: Aug 26, 2016, 03:46 PM IST
टेस्टमध्ये नंबर एकवर गेलेल्या पाकिस्तानची सोशल नेटवर्किंगवर गरळ title=

मुंबई : पाकिस्तान आणि इंग्लंडमधली टेस्ट सीरिज 2-2नं बरोबरीमध्ये सुटली आणि भारतानं वेस्ट इंडिजला 2-0 नं हरवलं. या विजयानंतरही भारताची आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत एक नंबरवरून दोन नंबरवर पीछेहाट झाली, तर पाकिस्तान पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचला.

भारताला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर गेल्यामुळे पाकिस्तानी चाहते मात्र भलतेच खुश झाले आहेत. अशाच काही चाहत्यांनी सोशल नेटवर्किंगवर गरळ ओकली आहे.

 

काही पाकिस्तानी फॅन्सनी विराट कोहलीचे मॉर्फ केलेले फोटो शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये पाकिस्तानी टेस्ट टीमचा कॅप्टन मिसबाह उल हक विराट कोहलीला खांद्यावर घेऊन उभा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मिसबाहा सिंहासनावर राजाच्या वेशात बसला आहे आणि कोहली त्याच्या बाजूला दास म्हणून दाखवण्यात आला आहे.