पीके हा सर्वोत्कृष्ट सिनेमा : मास्टर ब्लास्टर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज अभिनेता आमीर खानचा पीके सिनेमा पाहिला. यावर बोलतांना सचिन म्हणाला, आजपर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांमध्ये "पीके‘ सर्वोत्कृष्ट चित्रपट असून आमीरने वेगळी भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.

Updated: Dec 17, 2014, 07:29 PM IST
पीके हा सर्वोत्कृष्ट सिनेमा : मास्टर ब्लास्टर title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज अभिनेता आमीर खानचा पीके सिनेमा पाहिला. यावर बोलतांना सचिन म्हणाला, आजपर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांमध्ये "पीके‘ सर्वोत्कृष्ट चित्रपट असून आमीरने वेगळी भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.

आमीर खान याने "पीके‘ या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी सचिन तेंडूलकर उपस्थित होतो. सचिन पुढे म्हणाला की, "हा अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. मी आमीरला चित्रपटाचे कथानक उघड करणार नसल्याची खात्री दिली आहे. त्यामुळे मी कथानकाबद्दल काहीही सांगू शकत नाही. 

मात्र तुम्ही जा आणि हा एकदम वेगळा चित्रपट नक्की बघा. माझ्यासाठी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असून आमीरचा अभिनयही सर्वोत्कृष्टच आहे. आमीरची भूमिका एकदम वेगळी आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रपटातून एक चांगला मेसेज देण्यात आला आहे.

‘आमीर आणि अनुष्काची जोडीही उत्कृष्ट असल्याचेही सचिन पुढे म्हणाला. राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. "पीके‘ मध्ये आमीरने भोजपुरी बोलता येणाऱ्या अंतराळवीराची भूमिका साकारली आहे. येत्या शुक्रवार चित्रपटगृहात झळकणाऱ्या "पीके‘ मध्ये संजय दत्त, सुशांत सिंग राजपूत आणि सौरभ शुक्‍ला यांनीही भूमिका साकारल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.