प्रिती झिंटाचा युवराज नात्याबाबत नवा खुलासा

अभिनेत्री प्रिती झिंटाने गुपचूप विवाह केला तरी क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याबाबत अजूनही चर्चा सुरुच आहेत. यावर प्रितीने नवा खुलासा केलाय.

Updated: Apr 29, 2016, 04:03 PM IST
प्रिती झिंटाचा युवराज नात्याबाबत नवा खुलासा  title=

मुंबई : अभिनेत्री प्रिती झिंटाने गुपचूप विवाह केला तरी क्रिकेटर युवराज सिंग यांच्या नात्याबाबत अजूनही चर्चा सुरुच आहेत. यावर प्रितीने नवा खुलासा केलाय.

अनेक चढउतार पाहिले 

युवीबद्दल प्रितीने म्हटलेय, आमचे बाँडिंग खूप चांगले आहे. तो माझ्या टीमचा एक भाग होता आणि आम्ही दोघांनीही आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

खासगी आयुष्याविषयी बोलणे योग्य नाही!

मला खासगी आयुष्याविषयी फारसे बोलणे पसंत नाही. ज्यावेळी कुणी माझ्यासंदर्भात एखादी गोष्ट कन्फर्म न करता काहीही लिहितो, त्यावेळी मला फार विचित्र वाटतं. आता मात्र मला त्रास दिला जात नाही. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या मी मनावर घेतल्या आहेत, असे प्रितीने म्हटलेय.

बॉयफ्रेंडबाबत पाहा काय म्हटले?

युवराज सिंग याच्यासंदर्भातील नात्याबाबत अभिनेत्री प्रिती झिंटाने एक खुलासा केला आहे. एकेकाळी युवराज सिंग आणि ब्रेट ली यांना प्रीती झिंटाचे बॉयफ्रेंड असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, प्रिती झिंटाने त्यांच्या नात्याबाबत एक माहिती उघड केली आहे.

नात्याबाबत खुलासा

प्रिती झिंटाने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबाबत खुलासा केलाय. युवराजच नाही तर ब्रेट ली हा सुद्धा आपल्या भावासारखा आहे. ती सांगते, जेव्हा माझे नाव युवराज आणि ब्रेट लीसोबत जोडले गेले होते, तो काळ मी कधीच विसरु शकत नाही. हे दोघेही मला माझ्या भावासारखे आहेत. दरवर्षी मी त्यांना राखी बांधत असते.

प्रितीला काही दिवसांपूर्वी युवराजच्या लग्नाची तारीख विचारली गेली. त्यावेळी तिने म्हटले, तुम्हाला माहिती आहे का? लग्न कधी आहे. मी हे यासाठी विचारतेय, कारण स्पेशल गिफ्ट म्हणून मी राखी घेऊन जाईन. युवराज लग्न करतोय, याचा मला आनंद आहे.