मुंबई विरोधातील खेळीनंतर पुणे टीमच्या मालकाकडून धोनीचं कौतूक

आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करुन फायनलमध्ये पोहोचलेल्या पुणे टीमचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी महेंद्र सिंह धोनीचं कोतूक केलं आहे. मुंबई विरोधात धोनीने २६ बॉलमध्ये ४० रन केले. ज्यामुळे टीमने १६२ रनचा टप्पा गाठला.

Updated: May 19, 2017, 10:27 AM IST
मुंबई विरोधातील खेळीनंतर पुणे टीमच्या मालकाकडून धोनीचं कौतूक

नवी दिल्ली : आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करुन फायनलमध्ये पोहोचलेल्या पुणे टीमचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी महेंद्र सिंह धोनीचं कोतूक केलं आहे. मुंबई विरोधात धोनीने २६ बॉलमध्ये ४० रन केले. ज्यामुळे टीमने १६२ रनचा टप्पा गाठला.

पुणे संघाने या सामन्यात २० रनने मुंबईचा पराभव केला. सोशल मीडियावर नेहमी धोनीवर टीका करणाऱ्या हर्ष गोयंका यांनी विजयानंतर ट्विट करत म्हटलं की, 'धोनी द्वारे खेळली गेलेली शानदार खेळी, वॉशिंगटनची सुंदर बॉलिंग आणि स्मिथच्या चांगल्या कॅप्टन्सीमुळे पुणे आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला.'

आयपीएल- १० च्या सुरुवातीला आयपीएलमध्ये ९ वर्षांपासून कॅप्टन्सी करणाऱ्या धोनीकडून कर्णधारपद काढून घेतलं होतं. धोनीच्या कर्णधारपदावर देखील हर्ष गोयंका यांनी अनेकदा टीका केली होती.