संगकाराचा कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा विक्रम

न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं आपल्या शिरपेचात आणखी एक विक्रम केला आहे. कुमार संगकारानं कसोटी क्रिकेटमध्ये १२  हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय.

Updated: Jan 4, 2015, 03:28 PM IST
संगकाराचा कसोटी क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा विक्रम title=

वेलिंग्टन  : न्यूझीलंडमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं आपल्या शिरपेचात आणखी एक विक्रम केला आहे. कुमार संगकारानं कसोटी क्रिकेटमध्ये १२  हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केलाय.

 संगकारानं 130 कसोटी सामन्यांत 37 शतकं आणि 51 अर्धशतकांच्या जोरावर 12 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. सचिननं 200 कसोटी सामन्यांत 15 हजार 921 धावा करण्याचा पराक्रम गाजवला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरी बजावणारा संगकारा हा पाचवा फलंदाज ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संगकारा पहिल्या डावात सहा धावांवर, तर दुसऱ्या डावात केवळ एक धाव करुन माघारी परतला होता. पण दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात संगकारानं ट्रेण्ट बोल्टच्या गोलंदाजीवर दोन धावा काढून 12 हजार धावांचा टप्पा गाठला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.