सानिया-मार्टिना ग्वाँग्झू ओपन टेनिसच्या फायनलमध्ये

भारताची सानिया मिर्झा आणि स्विर्झलंडची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी ग्वाँग्झू ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आणखी एक पदक मिळण्यासाठी ती सज्ज झालेय.

PTI | Updated: Sep 26, 2015, 04:47 PM IST
सानिया-मार्टिना ग्वाँग्झू ओपन टेनिसच्या फायनलमध्ये title=
संग्रहीत

ग्वाँग्झू : भारताची सानिया मिर्झा आणि स्विर्झलंडची जोडीदार मार्टिना हिंगिस यांनी ग्वाँग्झू ओपन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आणखी एक पदक मिळण्यासाठी ती सज्ज झालेय.

सानिया आणि मार्टिना हिने अमेरिकन ओपन जिंकल्यानंतर आणखी एक पराक्रम करण्यास सज्ज आहे. सानिया-मार्टिना जोडीचा मुकाबला एक तास ११ मिनीटे झाला. यावेळी पाचवेळा विरोधी जोडीची सर्व्हीस तोडली आणि सामन्यावर आपली पकड निर्माण केली. सातपैकी पाच ब्रेक पाँईट मिळवत सामना आपल्याकडे खेचून आणला.

अमेरिकन ओपन जिंकताना या जो़डीने २,५०,००० डॉलरच कमाई केली आहे. या जोडीने इस्त्रायलच्या जुलिया ग्लुशको आणि स्वीडनची रेबेका पीटरसन या जोडीचा ६-३, ६-४ असा सेमीफायनलमध्ये पराभव केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.