कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Updated: Jan 21, 2017, 09:06 AM IST
कोलकात्याला पोहोचताच शिखर धवन थेट रुग्णालयात title=

कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने जिंकत भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतलीये. तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ शुक्रवारी कोलकातामध्ये दाखल झाला मात्र तेथे दाखल होताच भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भारतीय संघ कोलकात्याच्या सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर धवनला अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान त्याला रुग्णालयात दाखल का केले याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. 

शिखर धवनच्या दुखापतीबाबत कोणीचीही माहिती देता येणार नाही. तो नियमित तपासणीसाठी आला होता, अशी माहिती यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱयांनी दिली. 

गेल्या दोन्ही वनडेमध्ये शिखरची कामगिरी निराशाजनक राहिलीये. दोन सामन्यांत मिळून त्याला केवळ १२ धावा करता आल्या.