सहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी

इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.

Updated: Sep 6, 2014, 08:02 AM IST
सहज विकेट गमावल्याने पराभव : धोनी title=

लिड्स : इंग्लंडने आम्हाला दिलेले टार्गेट आम्ही सहज पूर्ण करु शकलो असतो मात्र, लवकच विकेट गेल्याच्या कारणाने आम्हाला शेवटच्या सामन्यात पराभव पत्कारावा लागल्याची कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांने दिली.

पाच वन डे मालिकेत भारताने 3-1ने विजय मिळविला. मात्र, त्याआधी कसोटी मालिकेत भारताला लाजिरवाना पराभव पत्करावा लागला होता. आमच्या लवकर विकेट गेल्या. त्यामुळे आम्ही इंग्लंडने दिलेले लक्ष्य गाठू शकलो नाही. शिखर धवन, अंबाती रायडू आणि मी लवकर बाद झालो. आम्हाल अशा विकेट द्यायला नको होते. शेवटच्या 10 ओव्हरमध्ये आम्ही जिंकण्यासाठी रन्स बनवू शकलो असतो. मात्र, आमच्याकडे विकेट नव्हत्या. दरम्यान, यावेळी धोनीने बॉलरचे कौतुक केले.

यापुढे आम्हाला शेवटच्या 10 ओव्हरमध्ये चांगले प्रदर्शन करायला पाहिजे. शमीने चांगली बॉलिंग केली. मात्र, अन्य खेळाडूंनी सुधारणा करण्याची गरज आहे. आम्हाला एवढे रन्स देणे उपयोगाचे नाही की, टार्गेटचा पाठलाग करताना विकेट घालवायच्या. तसेच आम्हाला या दौऱ्यात फिट राखण्यास आम्हाला कठिण काम होते.

इंग्लंडचा दौरा 77 दिवसाचा राहिला. आता विश्व वर्ल्डकपच्या आधी आम्ही ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. दरम्यान, सुरेश रैनाला मॅन ऑफ दी सिरीज म्हणून निवडण्यात आले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.