वर्ल्ड कपपूर्वी सुरेश रैनाची होणार दैना, 'तिच्या'मुळे हरवणार सुखचैना?

 वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने सपाटून मार खाल्यानंतर आता टीम इंडियासमोर पुन्हा एक अडचण समोर आली आहे. वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियाचा भरवशाच्या फलंदाज सुरेश रैनाची दैना होण्याची शक्यता आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 2, 2015, 01:08 PM IST
 वर्ल्ड कपपूर्वी सुरेश रैनाची होणार दैना, 'तिच्या'मुळे हरवणार सुखचैना? title=

नवी दिल्ली :  वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाने सपाटून मार खाल्यानंतर आता टीम इंडियासमोर पुन्हा एक अडचण समोर आली आहे. वर्ल्ड कप पूर्वी टीम इंडियाचा भरवशाच्या फलंदाज सुरेश रैनाची दैना होण्याची शक्यता आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. 

हिंदुस्तान टाइम्स या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकन क्रिकेट बोर्ड रैनाची चौकशी करू शकते. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. १८ डिसेंबरला स्थापन करण्यात आलेल्या या समितीत शमी सिल्वा, गमिनी विक्रमसिंघे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

२०१० मध्ये श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये उतरला होता. त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटमध्ये रैना एका मुलीसोबत दिसला होता. 

ही मुलगी सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचा अंदाज श्रीलंकन बोर्डाने व्यक्त केला आहे. त्यामुळे रैनाची या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.