न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नवी सिलेक्शन कमिटी आज न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करणार आहे.

Updated: Oct 6, 2016, 11:03 AM IST
न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा title=

नवी दिल्ली : एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नवी सिलेक्शन कमिटी आज न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे सीरिजसाठी भारतीय टीमची निवड करणार आहे.

वन-डे टीममध्ये फारसे बदल होणार नसल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे. टीमची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे असेल. केवळ दुखापतग्रस्त लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्याऐवजी कर्नाटकाचा ओपनिंग बॅट्समन मयांक अग्रवालची वर्णी लागू शकते.

त्याचप्रमाणे गौतम गंभीरचंही वन-डे टीममध्ये कमबॅक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. मनीष पांडे, बरिंदर सरन आणि जसप्रीत बुमराह हे तिघंही आपलं स्थान कायम राखण्यात यशस्वी होऊ शकतात.