टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव

वानखडे स्टेडियमवर पाचव्या आणि शेवटच्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला २१४ रन्सने हरवलं आहे, हा एक लाजीरवाणा पराभव समजला जात आहे, ही मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने खिशात टाकली आहे.

Updated: Oct 25, 2015, 11:53 PM IST
टीम इंडियाचा २१४ रन्सने लाजीरवाणा पराभव title=

मुंबई : वानखडे स्टेडियमवर पाचव्या आणि शेवटच्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला २१४ रन्सने हरवलं आहे, हा एक लाजीरवाणा पराभव समजला जात आहे, ही मालिका दक्षिण आफ्रिकेने ३-२ ने खिशात टाकली आहे.

दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ४३९ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, ही डोंगरा एवढी धावसंख्या टीम इंडियाला पार करता आली नाही. हे टार्गेट मिळवतांना टीम इंडिया ३६ षटकांत २२४ रन्सने बाद झाली. टीम इंडियाच्या बॉलर्सने अतिशय खराब कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला, तीन शतकांच्या जोरावर, चार विकेट गमावून दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांच्या जोरावर ४३८ रन्स केल्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.