भल्याभल्यांना लाजवणाऱ्या या महिला बॉडीबिल्डरला ओळखता का?

नवी दिल्ली : बॉडिबिल्डिंग म्हटलं की तगड्या पुरुषांची शरीरं आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र बॉडीबिल्डर महिलांबद्दल तुम्ही ऐकलंय का?

Updated: Apr 6, 2016, 09:43 PM IST
भल्याभल्यांना लाजवणाऱ्या या महिला बॉडीबिल्डरला ओळखता का? title=

नवी दिल्ली : बॉडिबिल्डिंग म्हटलं की तगड्या पुरुषांची शरीरं आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र बॉडीबिल्डर महिलांबद्दल तुम्ही ऐकलंय का? पण, अशा काही महिला आपल्याकडे आहेत. त्यातलीच एक म्हणजे गुडगावची यासमीनन मनक. २०१६चा बॉडी बिल्डींग अॅण्ड फिटनेस फेडरेशनचा मिस इंडिया किताब तिने मिळवलाय. 

गेली अनेक वर्ष ती वेटलिफ्टिंग करत आहे. पण, फक्त गेल्या तीन वर्षांपासूनच ती बॉडिबिल्डिंगकडे वळली आहे. खरं तर एक महिला असल्याने बॉडिबिल्डिंग करताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने यशाची अनेक शिखरं आज पादाक्रांत केलीयेत. तिच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवारानेही तिला तिच्या प्रवासात साथ दिली. 

सध्या ती गुडगावमध्येच व्यायामशाळा चालवते. ३०० तरुण तरुणी तिच्या व्यायामशाळेचे सदस्य आहेत. एक महिला व्यायामशाळा शाळा चालवते याचं अनेकांना आश्चर्य वाटायचं. पण, नंतर मात्र परिस्थिती सुधारली. सुरुवातीला अविश्वास दाखवणाऱ्यांनीही नंतर विश्वास दाखवला. 

आजवर मनकला अनेक किताब मिळाले आहेत. यापुढेही अनेक सन्मान मिळवण्याची तिला इच्छा आहे. आज मनकचं वय ३६ वर्ष आहे. पण, या वयातही तिचा उत्साह कायम आहे.