...तर आज सर्वांसोबत 'CHEERS' करत असता फिलिप

नोव्हेंबर २५... सीन एबॉटचा बाऊंजर बॉल... आणि मैदानात घडलेली एक दुर्घटना, ज्यानं संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडलं. प्रत्येक जण शोकाकुल झाला. 

Updated: Nov 30, 2014, 08:33 AM IST
...तर आज सर्वांसोबत 'CHEERS' करत असता फिलिप title=

मुंबई: नोव्हेंबर २५... सीन एबॉटचा बाऊंजर बॉल... आणि मैदानात घडलेली एक दुर्घटना, ज्यानं संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडलं. प्रत्येक जण शोकाकुल झाला. 

जर त्यादिवशी तो बॉल फिलिप ह्युजला खेळतांना लागला नसता तर आज तो आपले मित्र, कुटुंबियांसह आपला २६वा वाढदिवस साजरा करत असता. हो आज ३० नोव्हेंबरला फिलिपचा २६वा वाढिदवस आहे. 

ह्युजच्या आठवणींनी क्लार्कला अश्रू अनावर झाले. आज क्लार्क आपला सहकारी आणि ‘ब्रदर’चा वाढदिवस काही खास पद्धतीनं साजरा करतोय. क्लार्कनं ट्विटरवर ह्युजच्या वाढदिवसापूर्वी काही ट्विट्स केले. 

फिलिपच्या वाढदिवसाची आठवण काढून ट्वीट करायला सुरूवात झाली आणि अखेर लिहिलं आपले ड्रिंक्स घ्या आणि ह्युजसाठी ग्लास उचला!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.