टीम इंडियाने शाहीद आफ्रिदीला दिले खास गिफ्ट

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान वातावरण नेहमीच तणावपूर्ण असते. मैदानावर हे दोन संघ जणून एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले असता. 

Updated: Apr 19, 2017, 05:01 PM IST
टीम इंडियाने शाहीद आफ्रिदीला दिले खास गिफ्ट title=

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान वातावरण नेहमीच तणावपूर्ण असते. मैदानावर हे दोन संघ जणून एकमेकांसमोर कट्टर शत्रू म्हणून उभे राहिलेले असता. 

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचा ऑल-राउंडर क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने निवृत्ती जाहीर केली. यावेळी विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने त्याला खास फेअरवेल गिफ्ट दिले.

शाहिदला विराट वनडे सामन्यात घालणारी एक जर्सी देण्यात आलीये. या जर्सीवर संपूर्ण संघाने स्वाक्षऱ्या केल्यात. यासोबतच एक मेसेजही दिलाय. 

पाकिस्तानी पत्रकार फैजान लखानी यांनी हा फोटो ट्विटरवरुन शेअर केलाय. टीम इंडियातील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या असलेला विराटची जर्सी शाहीद आफ्रिदीसाठी. असे फैजान यांनी ट्विटरवर म्हटलेय.