विराट-अनुष्का दिसले दिल्लीत

विराट कोहली आणि अनष्का शर्मा ऑस्ट्रेलियानंतर पुन्हा एकदा हातात हात घेऊन दिल्लीत फिरतांना दिसले. यावेळी निमित्त होते ते सुरेश रैनाच्या लग्नाचे. सुरेश रैनाच्या लग्नानिमित्त दोघेही दिल्लीत पोहचले आहेत.

Updated: Apr 1, 2015, 07:19 PM IST
विराट-अनुष्का दिसले दिल्लीत title=

दिल्ली : विराट कोहली आणि अनष्का शर्मा ऑस्ट्रेलियानंतर पुन्हा एकदा हातात हात घेऊन दिल्लीत फिरतांना दिसले. यावेळी निमित्त होते ते सुरेश रैनाच्या लग्नाचे. सुरेश रैनाच्या लग्नानिमित्त दोघेही दिल्लीत पोहचले आहेत.

सुरेश रैना ३ एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आपल्या आईच्या मैत्रीनीची मुलगी प्रियांका चौधरी सोबत सुरेश रैनाचं लग्न होणार आहे. दिल्लीच्या लीला पॅलेस हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे.

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार विराट आणि अनुष्का सोमवारी दिल्लीतील एका पॉश हॉटेलमध्ये डिनर करण्यास गेले होते. तेथील काही फॅन्सना त्यांनी ऑटोग्राफही दिले. त्या अनुष्का विराटच्या दिल्लीतील मीरा बागेतील घरी जाऊन विराटच्या कुटुंबीयांना सुद्धा भेटली असल्याचे वृत्त आहे.

IPL-8 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अनुष्का परफॉर्म करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत अनुष्काकडून कोणतही स्पष्टीकरण आलेले नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.