विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला

चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

Updated: Oct 22, 2015, 10:12 PM IST
विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला title=

चेन्नई: चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

आणखी वाचा - LIVE स्कोअरकार्ड : चौथी वनडे | भारत विरू्ध दक्षिण आफ्रिका

सध्या विराटच्या पुढे चार बॅट्समन असून ते सर्वजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत झाले आहेत. भारताचा सचिन तेंडूलकर (४९), ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिग(३०), श्रीलंकेचा संगकारा(२५), सनथ जयसुर्या (२८). विराटनं २३ सेंच्युरीजचा पराक्रम १६५ वनडे मॅचमध्ये केला आहे. 

विराट कोहलीच्या सेंच्युरीच्या जवळ सध्या दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आणि एबी डिव्हिलियर्स आहे. त्यांच्या प्रत्येकी २१ सेंच्युरी आहेत. 

आणखी वाचा - विराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.