2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग

2007 मध्ये टीममधून बाहेर बसावं लागल्यानंतर निराश झालेल्या विरेंद्र सेहवागनं तेव्हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता... हा खुलासा खुद्द सेहवागनंच 'झी न्यूज'शी बोलताना केलाय.

Updated: Oct 29, 2015, 11:43 AM IST
2007 मध्येच निवृत्तीचा विचार होता, पण सचिननं रोखलं - वीरेंद्र सेहवाग title=

नवी दिल्ली : 2007 मध्ये टीममधून बाहेर बसावं लागल्यानंतर निराश झालेल्या वीरेंद्र सेहवागनं तेव्हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता... हा खुलासा खुद्द सेहवागनंच 'झी न्यूज'शी बोलताना केलाय.

सेहवागनं आपल्या 37 व्या वाढदिवसाच्या दिवशी 20 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. त्यानं शेवटची मॅच खेळली होती ती त्याच्या निवृत्ती जाहीर करण्याअगोदर जवळपास अडीच वर्ष... मार्च 2013 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खेळल्यानंतर सेहवागच्या टीममध्ये परतीची दारचं बंद झाली होती.

अधिक वाचा - सेहवाग-सचिन पुन्हा एकत्र खेळतांना दिसणार

'मलाही करिअरच्या टॉपवर असतानाच निवृत्ती घ्यायला आवडली असती... चांगलं खेळत असतानाच निवृत्ती जाहीर करावी ही प्रत्येक क्रिकेटरचीच इच्छा असते... मलाही निवृत्तीच्या वेळी भाषण देता आलं असतं... पण, नशिबात काही वेगळंच होतं' असं सेहवागनं झी न्यूजशी बोलताना म्हटलंय.

अधिक वाचा - दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर

आपल्याला सिलेक्टर्सनं योग्य संधी दिल्या नाहीत... मॅचमध्ये थो़डा मागे पडल्यानंतर लगेचच आपल्याला टीममधून बाहेर करण्यात आलं, अशी नाराजीही त्यानं यावेळी व्यक्ती केलीय.

2013 साली ऑस्ट्रेलिया सीरिजदरम्यान मला जेव्हा टीममधून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला... तेव्हा सिलेक्टर्सनं मला माझ्या भविष्याबद्दलच्या प्लानबद्दल विचारल नाही... तेव्हा जर सिलेक्टर्सनं मला आपला निर्णय सांगितला असता तर तेव्हाच मी निवृत्ती जाहीर करण्याचा विचार केला असता' असंही सेहवानगं म्हटलंय. 

अधिक वाचा - व्हिडीओ | शोएबने सेहवागला चिडवल्यानंतर सचिनने मारलेला षटकार 

परंतु, सेहवागची ही अपूर्ण इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 3-7 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये बीसीसीआयकडून या दिग्गज खेळाडूला अधिकृतरित्या निरोप दिला जाऊ शकतो. त्यामुळे, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला या आपल्याच घरगुती मैदानावर सेहवागला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.... आणि साहजिकच क्रिकेटचा प्रत्येक चाहता त्याचं हे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असेल.

पाहा काय म्हणतोय वीरु...

रिटायरमेंट के बाद वीरेंद्र सहवाग का पहला धुआंधार टीवी इंटरव्यू

जैसी बैटिंग वैसे बोल! इंटरनेशनल क्रिकेट से रिटायरमेंट के बाद वीरेंद्र सहवाग का पहला धुआंधार टीवी इंटरव्यू सुधीर चौधरी के साथ। एक्सक्लूसिव हाईलाइट्स देखिए आज रात 9 बजे सिर्फ Zee News पर। #ByeSehwag Virender Sehwag

Posted by Zee News Hindi on Wednesday, October 28, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.