पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच... 

Updated: Mar 26, 2015, 11:07 PM IST
पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच title=

सिडनी : टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच... 

मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना धोनी कुणाच्या तरी दिशेनं बोट करून रागानं हातवारे करताना दिसला... धोनीला भडकलेला पाहून सगळेच चिडीचूप झाले. मात्र, मैदानात नेमकं काय घडलं? धोनी कुणाच्या दिशेनं बोट दाखवत होता? धोनीला नक्की कुणी डिवचलं? याचा उलगडा होऊ शकलेला नाही.
 
दरम्यान, निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं कर्णधार महेंद्र सिंग धोणीने सामन्यानंतर स्पष्ट केलंय. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्डकपनंतर निवृत्तीबाबत आपण विचार करू असंही त्यानं म्हटलंय. आपण अजून 33 वर्षांचे असून निवृत्तीबाबत कोणताही विचार करत नसल्याचं सांगत कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आपल्या निवृत्तीच्या चर्चांना पुर्णविराम लावलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.