सर्वाधिक टीम्सकडून आयपीएल खेळणारे खेळाडू कोण ?

आयपीएलचा यंदाचा नववा सिझन सुरु आहे. आत्तापर्यंतच्या 9 सिझनमध्ये अनेक खेळाडू वेगवेगळ्या टीम्सकडून खेळताना क्रिकेट रसिकांनी पाहिले.

Updated: May 1, 2016, 06:14 PM IST
सर्वाधिक टीम्सकडून आयपीएल खेळणारे खेळाडू कोण ? title=

मुंबई: आयपीएलचा यंदाचा नववा सिझन सुरु आहे. आत्तापर्यंतच्या 9 सिझनमध्ये अनेक खेळाडू वेगवेगळ्या टीम्सकडून खेळताना क्रिकेट रसिकांनी पाहिले. पण पार्थिव पटेल आणि अॅरोन फिंच हे दोन खेळाडू आत्तापर्यंतच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक टीम्सकडून खेळले आहेत. 

पटेल आणि फिंच हे आत्तापर्यंत झालेल्या नऊ सिझनमध्ये तब्बल सहा टीम्सकडून खेळले आहेत. पार्थिव पटेल हा चेन्नई, कोची, डेक्कन चार्जर्स, सनरायजर्स हैदराबाद, बैंगलोर आणि मुंबई या सहा टीम्सकडून खेळला. तर फिंच हा राजस्थान, दिल्ली, पुणे वॉरिअर्स, सनराजर्स हैदराबाद, मुंबई आणि आता गुजरात लायन्सकडून खेळत आहे.