युवराजचा आयपीएलमध्ये कमबॅक

Updated: May 6, 2016, 03:33 PM IST
युवराजचा आयपीएलमध्ये कमबॅक title=

हैदराबाद : स्टार क्रिकेटर युवराज सिंग पायाच्या दुखापतीपासून आता बरा झालेला आहे. आज सनराजइसर्ज हैदराबाद आणि गुजरात लायन्समध्ये होणाऱ्य़ा सामन्यात युवराज सिंग खेळणार आहे.

हैदराबादचे प्रशिक्षक काय म्हणाले 

या मॅचमध्ये युवराज सिंग खेळेल याला हैदराबाद टीमचे कोच टॉम मुडींनीही दुजोरा दिला आहे. युवराज सिंग अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या कमबॅकमुळे हैदराबाद टीमला फायदा होईल, तसंच टीममधला उत्साह वाढेल असंही टॉम मुडी म्हणाले आहेत.