युवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा

टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू क्रिकेटपटू युवराज सिंग याचा साखरपुडा अभिनेत्री हेजल किचसोबत झाल्याचे वृत्त हाती आलेय. इंडोनेशियातील बाली बेटावर हा सोहळा पार पडल्याचे वृत्तात म्हटलेय.  

Updated: Nov 12, 2015, 12:32 PM IST
युवराज सिंगचा गुपचूप बालीत साखरपुडा title=

बाली : टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडू क्रिकेटपटू युवराज सिंग याचा साखरपुडा अभिनेत्री हेजल किचसोबत झाल्याचे वृत्त हाती आलेय. इंडोनेशियातील बाली बेटावर हा सोहळा पार पडल्याचे वृत्तात म्हटलेय.  

२०११च्या विश्व कपमधील हिरो युवराज सिंग यांने गुपचूप सर्वांना धक्का देत गर्लफ्रेंड हेजल किचबरोबर साखरपुडा केलाय. काही दिवसांपूर्वी युवीने लग्नाबाबत संकेत दिले होते.

युवीने हरभजन सिंग आणि अभिनेत्री गीता बसरा यांच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती. यावेळी त्याच्या सोबत किच होती. युवीचे आणि किच यांचे अनेक दिवसांपासून डेट सुरु होते. मात्र, साखरपुड्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेजल किच ही अभिनेत्री, नृत्यांगना, कॉमेडीयन आणि मॉडेल आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.