स्टेडियममधील झहीरचा 'तो किस्सा किसचा'

भारत आणि पाकिस्तान दरम्यान कसोटी सामना होता, भारताची बॅटिंग होती. वीरेंद्र सहवाग 82 धावांवर तर राहुल द्रविड 5 धावांवर खेळत होता.

Updated: Jul 1, 2014, 07:08 PM IST
स्टेडियममधील झहीरचा 'तो किस्सा किसचा' title=

मुंबई : भारत आणि पाकिस्तान दरम्यान कसोटी सामना होता, भारताची बॅटिंग होती. वीरेंद्र सहवाग 82 धावांवर तर राहुल द्रविड 5 धावांवर खेळत होता.

इतक्यात टेलव्हिजनसाठी लाईव्ह रेकॉर्डिंग करणाऱ्या कॅमेरामनच्या नजरेला स्टेडियममधील एक युवती पडली. ही युवती नजरेस पडण्याचं कारण तिच्या हातात असलेला 'झहीर आय लव्ह यू'चा फलक...

ही युवती फलकासह कॅमेऱ्यात टिपली गेली, स्टेडियमधील स्क्रीनवर बराच वेळ झळकली. यानंतर दुसऱ्या कॅमेरामनने लाईव्ह दृष्य टिपण्यासाठी पव्हेलियनमध्ये बसलेल्या झहीरला अंधुक प्रकाशात का असेना शोधून काढलं.

बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ : 'जहीर'चा तिला 'जाहीर' किस

स्टेडियममधील युवती ही तुला 'लाईव्ह किस' देतेय, असं बाजूला बसलेल्या नटखट युवराज सिंहने पुन्हा पुन्हा झहीर खानला हनुवटी धरून सांगितलं. हे दृश्य त्या युवतीसह अख्या स्टेडियममध्ये आणि सामना घरीबसून टेलव्हिजनवर लाईव्ह पाहणारे प्रेक्षक पाहत होते.

मात्र झहीरकडून कोणतीही प्रतिक्रिया दिसत नव्हती, या युवतीने स्क्रीनवर दिसल्यावर पुन्हा आपलं झहीरवरचं प्रेम व्यक्त केलं. यानंतर पुन्हा कॅमेरा स्टेडियममध्ये बसलेल्या झहीरवर गेला. शेवटी झहीरनेही एक फ्लाईंग किस देऊन टाकला आणि साक्षीदार प्रेक्षकांनी अख्ख स्टेडियम डोक्यावर घेतलं.

पाहा हा व्हिडीओ - झहीरचा 'तो किस्सा किसचा'

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.